पवार विद्यालयात शिक्षक पालक संघाची सभा

पाचोरा प्रतिनिधी । नगरदेवळा ता.पाचोरा येथील सरदार एस. के. पवार विद्यालयात  शिक्षक – पालक संघाची सभा ग्रामशिक्षण समितीचे मानद चिटणीस शिवनारायण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

 प्रथम सरस्वती पुजन करून शिक्षक – पालक संघाच्या अध्यक्षपदी मुख्याध्यापक व्ही. बी. बोरसे तर उपाध्यक्षपदी शैलेंद्र बिरारी यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येऊन उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. 

प्रसंगी निळकंठ काटकर, किशोर पाटील, अब्दुल गनी शेख, वामन पाटील, जगन पाटील, प्राचार्य व्ही. बी. बोरसे, उपप्राचार्य एस. एल. महाजन, श्रीमती साळुंखे पालक, शिक्षक होते.

 

Protected Content