कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे मराठा तरुण महामंडळाच्या कर्जापासून वंचित

images 1

रावेर (प्रतिनिधी) अण्णा साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा मनमानी कारभार सुरु असून मराठा बेरोजगार तरुणांना कर्ज तर दूर साधी कर्ज कसे मिळेल याची माहिती देण्यासाठी येथील अधिकारी दिरंगाई करत असल्याच्या आरोप तरुण करत आहेत.

या कार्यालयातून व्यवस्थित माहिती मिळत नसल्याने गाव-खेड्यातुन खर्च करून आलेल्या मराठा बेरोजगार युवकाला नाहक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. मराठा समाजातील युवक शिक्षणात,आर्थिक,शासकीय सेवेत,उद्योगक्षेत्राकडे वळावे म्हणून भाजपा सरकार मराठा समाजासाठी मोठया प्रमाणावर योजना अंमलात आणून थेट मराठा युवकांना लाभ मिळेल यासाठी मोलाचे प्रर्यत्न करीत आहे. परंतु, त्यांच्या या प्रयत्नला अण्णा साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात कार्यरत कर्मचारी हरताळ फासत आहे. मराठा समाजाच्या युवकांसाठी अण्णा साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तर्फे सवलतीच्या दरात कर्ज देऊन उद्योग धंदे रोजगार देण्यासाठी महाराष्ट्र शासन आर्थिक मदत करीत असते. परंतु, जळगाव अण्णा साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील अधिकारी याची माहिती देण्यास टाळा-टाळ करीत असतात. तिथे गेल्यास सतत अधिकारी गायब असतात यामुळे गरीब मराठा तरुणांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे वरीष्ठानी लक्ष देण्याची मागणी मराठा युवकांमधुन होत आहे.

Add Comment

Protected Content