बद्रीनारायणाच्या जयघोषाने दुमदुमला बहादरपुर परिसर

WhatsApp Image 2019 11 11 at 7.37.21 PM

पारोळा, प्रतिनिधी | तालुक्यातील बहादरपुर येथे प्राचीन जागृत देवस्थान असलेले श्री क्षेत्र बद्रीनारायण मंदिराचा रथोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. परंपरा नुसार श्रीराम लाल मिश्रा यांचे वंशज नारायण मिश्रा यांच्या हस्ते बद्रीनारायण महाराजांचे व रथाचे विधिवत पूजन करून दुपारी १२ वा. बद्रीनारायण भगवान की जय   घोष करत  रथोत्सवास प्रारंभ करण्यात आला.

रथाच्या अग्रभागी भव्यदिव्य असा नगारा व त्यानंतर राग मिश्रा विद्या मंदिरातील लेझीम पथक तसेच गावातील तेली वाडा मित्र मंडळ ,नवनाथ मित्र मंडळ, लाल किल्ला मित्र मंडळ, पाटील वाडा मित्र मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ, भोई वाडा, असे विविध मित्र मंडळांनी ढोल ताशेच्या गजरात स्वागत करत होते. रथाच्या अग्रभागी अश्वारूढ अर्जुन तर रथावर हनुमान यांची मूर्ती बसविण्यात आली होती. रथाच्या मार्गावर सुंदर रांगोळी व फुलांच्या पाकळ्यांनी सजवला होता. भाविकांनी रथाचे फुलांचा वर्षाव करून स्वागत करतकेले. रथाच्या मार्गात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

आकर्षक फुलांची सजावट

रथाला आकर्षक अशा फुलांनी सजविण्यात आले होते. कळसावर उस व भगवा ध्वज उंचावर फडकत होता. रथाच्या चारही बाजूंना केळीचे खांब बांधण्यात आले होते. ही सर्व फुलांची आकर्षक सजावट गणपत सहादु वाणी यांनी केली होती.

मोगरी लावण्याचा मान भोई समाजाला

बहादरपूर गावात भोई समाजाला मोगरी लावण्याचा मान मिळत असतो यात जानकीराम भोई, अण्णा भोई विक्रम भोई, सुनील भोई, भुषण भोई, राम भोई, अनिल लोहार, मधुकर वाणी, मोहन भोई, भाईदास भोई आधीच समाजबांधव मदत करत असतात.

रथाचा मार्ग
बहादरपुर ग्राम पंचायत मार्गे ,बाजारपेठ, जेडीसीसी बँक, शिरसोदे ग्रामपंचायत, मोठा पाटील वाडा, मारुती चौक भट्टी चौक ,महाजन वाडा, पिंपळ चौकातून, श्रीकृष्ण चौक, रथ सायंकाळी. उशिरा पर्यंत जागेवर आणण्यात आला.

Protected Content