दहिगावच्या बालिकेने धरले रमजानचे रोजे !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दहिगाव येथील तलफीन बी या आठ वर्षाच्या बालिकेने रमजानचे रोजे धरले असून यामुळे तिचे परिसरातून कौतुक होत आहे.

सर्वत्र मुस्लीम बांधवांच्या पवित्र समजल्या जाणार्‍या रमजान महिना सुरू असुन या महीन्यात ईस्लाम धर्मात पवित्र रमजानला अनन्यसाधारण महत्व आहे. या महीन्यात मुस्लीम बांधवांकडुन अल्लाहची विशेष इबारत ( उपासना ) केली जाते .यासाठी रोजेदार हे संपुर्ण दिवसभर निरंकार रोजे ( उपवास ) पाळतात. तालुक्यातील दहिगाव येथील राहणार्‍या आठ वर्षाच्या तलफीन बी हिने पवित्र रमजान महीन्याचे पुर्ण रोजे ( उपवास ) धरले आहेत.

मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महीन्याचे शेवट होणार असून , दहिगाव तालुका यावल येथील शेख एहेतेशाम शेख कदीरोद्दीन यांच्या आठ वर्षाची मुलगी शेख तलफीन बानो हिने पवित्र रमजान महीन्याचे संपुर्ण रोजे ठेवले आहेत. यामुळे तिचे समाज बांधवांमध्ये विशेष कौत्तुक करण्यात येत असुन , तलफीन बानो चे तिची आई , वडील शेख एहेतेशाम शेख कदीरोद्दीन ( मिस्त्रि) व सर्व कुटुंब्यांनी तिला आशिर्वाद दिले आहेत.

Protected Content