‘हंबड्री’ येथे आदीवासी समाज बांधवांसाठी खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धस प्रारंभ

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील ‘हंबडी’ येथे तडवी प्रिमियर लिगच्या तालुका पातळीवरील ‘खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्ध’चे आज यावल येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.कुंदन फेगडे आणि रागिणी फाउंडेशन सावखेडा सिम यावलचे तालुकाध्यक्ष तथा आदीवासी चळवळीतील युवा कार्यकर्त सलीम तडवी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

‘हंबड्री’ गावातील बसस्थानकाजवळील फैजपूर रोडावरील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या आदीवासी समाज बांधवांसाठीच्या या तड़वी प्रीमियर लिग खुल्या मर्यादीत षटकांची क्रिकेट स्पर्धत तालुक्यातील तथा परिसरातील एकूण २५ आदीवासी समाजातील तरूणांच्या संघानी आपला सहभाग नोंदविला आहे.

या स्पर्धत प्रथम विजेता संघाला डॉ.कुंदन फेगडे यांच्या वतीने २१,००० रुपयांचे बक्षीस व स्मृती चिन्ह तसेच या स्पर्धतील अंतीम लढतीतील उप विजेता संघास आदीवासी सामाजिक कार्यकर्त सलीम तडवी यांच्या वतीने ११, ००० अकरा हजार रूपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे .

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सलीम तड़वी यांनी यावेळी युवा तरुण खेळाडूंशी संवाद साधतांना म्हणाले की, “आपल्या देशात ग्रामीण पातळीवरून क्रिकेट खेळून अनेक क्रिकेटपटूंनी आपल्या देशाच्या संघाचे नेतृत्व केले असून या खेळांमुळे माणसाचा बौद्धीक व शारीरिक विकास होत असतो. तरूणांनी विविध खेळांच्या माध्यमातून त्यांनी आपले कौशल्यगुण दाखवावे” असे आवाहन तडवी यांनी केले .

यावेळी इतबार तड़वी भुसावल, शोएब शब्बीर तड़वी भुसावल, मुराद तड़वी मालोद, अजित तड़वी यावल, अशरफ सर सांगवी, परवेज तड़वी यावल, अमित तड़वी यावल, ग्रामसेवक राजू तड़वी आदींची याप्रसंगी उपस्थिती लाभली. हंबड्री येथील तड़वी टाइगर ग्रुप हंबडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त तसेच आदीवासी समाज बांधव हे या प्रसंगी उपस्थित होते.

Protected Content