‘शिवाजीनगर उड्डाणपूला’ जवळचा रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता आजपासून सुरु करण्याच्या प्रक्रियेला वेग

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा परिषद शेजारी ‘शिवाजीनगर उड्डाणपूला’चे काम सुरु असल्याने जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोरील रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. हा रस्ता आज पुन्हा सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी याबाबत माहिती देतांना सांगितले की, “शिवाजीनगर उड्डाणपूल उभारणीचे काम चालू आहे. या परिसरात मक्तेदाराने बांधकाम साहित्य चोरीस जावू नये म्हणून पत्र्यांचा आडोसा लावलेला आहे. यामुळे जिल्हा परिषदेकडून रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता रहदारीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. हा रस्ता तीन वर्षांनंतर आज सायंकाळपर्यंत पुन्हा रहदारीसाठी खुला करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. उड्डाणपूलाचे काम सुरु असल्याने हा रस्ता असमतोल बनला आहे. त्यास जेसीबीच्या सहाय्याने समतोल करण्यात येत आहे. दि.३१ मार्च मार्चपर्यंत ह्या पुलाचे काम होण्याचे अपेक्षित असून तो ‘मे’मध्ये रहदारीस उपलब्ध होणार आहे.

याविषयी मक्तेदार यांच्यावतीने राजेंद्र वारके यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना, “रेल्वे स्टेशनच्या भागाकडील रस्ता समतोल करण्यात आलेला आहे. जिल्हा परिषदकडील भागास समतोल करण्याचे काम प्रगतीपथावर असून आज सायंकाळपर्यंत अधिकाधिक भाग समतोल करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.” अशी माहिती दिली.

Protected Content