चोपडा येथील बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी

चोपडा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील बोरोले नगरातील बंद घरातून सोन्याचे मणी व मोबाईल असा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, “शेखर दिगंबर पाटील (वय-३२) रा. पंडित कॉलनी बोरोले नगर, चोपडा हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. दि.३० जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत ते घराला कुलूप लावून लग्ना निमित्त ‘चहार्डी’ येथे भावाकडे गेले होते.

घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातून ९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी व १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण १९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकार समोर आला आहे. याबाबत शेखर पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुभाष सपकाळ करीत आहे.

 

 

Protected Content