अपघातात जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या वाघ नगर येथील महिलेचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना सोमवारी दुपारी उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची  नोंद करण्यात आलेली आहे. प्रतिभा पिंन्टू ठाकरे (वय-३८) रा. वाघ नगर, जळगाव असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील वाघ नगर परिसरात राहणाऱ्या प्रतिभा ठाकरे या आपल्या परिवारासह वास्तव्याला होत्या. १३ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास त्या बांभोरी गावाजवळील जैन इरिगेशन कंपनीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत प्रतिभा ठाकरे ह्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना जळगाव शहरातील छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सोमवारी २० मार्च रोजी सकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, दुपारी २ वाजेच्या सुमारास उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ सोनी करीत आहे.

Protected Content