चैन स्नॅचिंग : वृध्द महिलेच्या गळ्यातील मंगलपोत धुमस्टाईल लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील निमखेडी शिवारात असलेल्या चंदूअण्णा नगरात रस्त्यावरून पायी जाणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगलपोत अज्ञात दोन भामट्यांनी दुचाकीवर येऊन जबरी तोडून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत गुरूवार २७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विजया दिलीप पाटील (वय-६०) राहणार साई विहार कॉलनी, चंदू अण्णा नगर, निमखेडी शिवार, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरुवार २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास वृद्ध महिला या रस्त्यावरून पायी जात असताना त्यांच्या मागून अनोळखी दोन जण पल्सर गाडीवर येऊन त्यांच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीची साडेचार तोळ्याची सोन्याची मंगलपोत जबरीने तोडून घेऊन पसार झाले. ही घटना घडल्यानंतर विजया पाटील या वृद्ध महिला तातडीने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन माहिती दिली. त्यांच्या फिर्यादीवरून दुपारी ४ वाजता अज्ञात दोन जणांना विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.

Protected Content