यावल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

यावल प्रतिनिधी । “युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे “शिल्पकार” महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३०वी जयंतीनिमित्त शहरातील सिद्धार्थ नगर येथे प्रतिमा पूजन व झेंडा वंदन करण्यात आले. 

याप्रसंगी उपस्थितांच्या हस्ते प्रतिमा पूजन जिल्हा परिषद चे गटनेते तथा तालुका अध्यक्ष कॉंग्रेस प्रभाकर अप्पा सोनवणे याच्या हस्ते करण्यात आले. तसेच ध्वजारोहण यावलचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील  यांच्या हस्ते करण्यात आले.  याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन कदीर खान (कॉंग्रेस शहर अध्यक्ष ), अनिल जंजाळे (कॉंग्रेस शहर  उपाध्यक्ष), प्रमोद पारधे, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शहा, नगरसेवक मनोहर सोनवणे, विकी गजरे, युवराज सोनवणे, प्रदिप गजरे, डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष निलेश सपकाळे, राहुल पारधे, सुनिल अमरुत गजरे, मयुर घारू, गौतम पारधे, शुभम गजरे, विलास मेढे, अतुल पारधे,आकाश सुरवाडे, बबलू पारधे, आकाश बिऱ्हाडे, जितु पारधे, शुभम पारधे, प्रशांत गजरे, कुंदन पारधे, चेतन गजरे, मंथन महिरे, भुषण बागुल, सचिन पारधे, सनी पारधे, निखिल पारधे, चंद्रकांत पारधे, अनिकेत बिऱ्हाडे हे उपस्थित होते.

 

Protected Content