


फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सांगवी आणि फैजपूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने शंखनाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा हिंगोणा सावखेडा जिल्हा परिषद गटाचा सांगावी बु येथे ज्योती विद्या मंदीर येथे सकाळी १० वाजता , तर न्हावी – बामणोद जिल्हा परिषद गट आणि फैजपूर शहराचा सुमंगल लॉन फैजपूर येथे दुपारी ३ वाजता होणार आहे. या मेळाव्यास पालकमंत्री गिरीश महाजन,माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, ना.हरिभाऊ जावळे,खासदार रक्षाताई खडसे, जिल्हाध्यक्ष संजीव पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डी. के. चौधरी,अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य मीनाताई तडवी, लोकसभा विस्तारक हर्षल पाटील,जिल्हा सरचिटणीस सुनील नेवे हे उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यास भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,जि.प.सदस्य,प.स.सदस्य,सर्व आघाड्या,शक्ती केंद्र प्रमुख ,पेज प्रमुख,गट प्रमुख,बूथ प्रमुख,महिला प्रमुख,शहर प्रमुख आणि समस्त भाजप परिवारातील सदस्यांनी उपस्थित राहण्याचे अवाहन यावल तालुका अध्यक्ष डाँ.नरेंद्र कोल्हे,तालुका सरचिटणीस विलास चौधरी,सरचिटणीस उज्जैनसिह राजपूत यांनी केले आहे.


