चोपड्यातील आदर्शनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबविली

चोपडा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरातील आदर्श नगरात मध्यरात्री चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण २२ हजार ५३० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

चोपडा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद देवराम सोनवणे (वय-४४) रा. आदर्श नगर चोपडा हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. १२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घरात सर्वजण झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून प्रवेश केला. घरातील कपडे अस्ताव्यस्त फेकून कपाटातील सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण २२ हजार ५३० किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत मिलींद सोनवणे यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक श्रीराम पाटील करीत आहे.

Protected Content