अमळनेर पंचायत समितीच्या गणाचे आरक्षण घोषीत

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात आज पंचायत समितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. या अनुषंगाने अमळनेर पंचायत समितीच्या १० गणांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.

यात अमळनेर येथील इंदिरा भुवन हॉलमध्ये प्रांताधिकारी सीमा अहिरे तसेच तहसीलदार मिलींद कुमार वाघ यांचा नियंत्रणाखाली हा कार्यक्रम पार पडला.

अमळनेर तालुक्यातील प.स.गण आरक्षण पुढीलप्रमाणे –
1) जानवे गण- अनुसूचित जाती महिला
2) मंगरूळ गण- अनुसूचित जमाती
3) दहिवद गण- अनुसूचित जमाती महिला
4) सारबेटे बु – नामाप्र महिला
5) मुडी प्र.डा. गण- नामाप्र सर्वसाधारण
6) मांडळ गण- सर्वसाधारण
7) कळमसरे गण-सर्वसाधारण
8) प्र डांगरी गण- सर्वसाधारण महिला राखीव
9) पातोंडा गण- सर्वसाधारण महिला राखीव
10) अमळगाव गण- सर्वसाधारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.