शेतकऱ्यांच्या विजेसंबंधीत समस्या तात्काळ सोडवा – आमदार किशोर पाटील (व्हिडीओ)

पाचोरा (नंदू शेलकर ) । पाचोरा व भडगाव तालुक्यातील विजेच्या विविध प्रश्ना संदर्भात आमदार किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दुपारी १२ वाजता विज वितरण कंपनीच्या दोन्ही तालुक्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शेतकऱ्यांनी मागणी करूनही तात्काळ ट्रान्सफार्मर का दिले जात नाहीत? असा जाब आमदार किशोर पाटील यांनी विचारत अधिकाऱ्यांना विविध निर्देश दिले.

जनतेला चांगली सेवा न दिल्यास कोणाचीही गय केली जाणार नसल्याची तंबी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. अनेक गावात ४ महिने होऊनही डी.पी. बदलून दिली जात नाही, काही गावात वायरमन नाहीत, ऑइल कमी असेल तर मला कल्पना द्या, मी मदत करतो मात्र मला काय अडचणी आहेत त्या सांगा, पावसाळ्यात एवढ्या अडचणी आहेत तर पुढे कसे कराल ? तसेच जनतेशी सौजन्याने वागा अशी सूचना केली.

यावेळी नगरदेवळा उपकेंद्राचे अभियंता बोरणारे यांचे विषयी बैठकित जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांनी निपाणे गाव परिसरातील विविध अडचणी मांडतांना आक्रमक झाले होते. विविध प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याबाबत त्यांनी अभियंता बोरनारे यांचे विषयी नाराजी व्यक्त केली. उपनगराध्यक्ष शरद पाटे, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, गणेश पाटील यांनी शहरी भागातील समस्या मांडल्या अभय पाटील, उद्धव मराठे यांनी वाणेगाव, शिंदाड, पिंपळगावच्या समस्या मांडल्या.

बैठकीत खेडगाव, महिंदळे, कोठली, वाडी शेवाळे आदी गावातील प्रश्न चर्चेत आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, पदमसिंग पाटील, संजय पाटील, माजी जि.प. सदस्य उद्धव मराठे, जिल्हा उपप्रमुख अॅड.अभय पाटील, माजी उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील, उपनगराध्यक्ष शरद पाटे, दत्तात्रय बोरसे, कॉन्ट्रॅक्टर ठाकरे यांची उपस्थिती होती. तसेच प्रभारी कार्यकारी अभियंता आर. व्ही. शिरसाठ, अभियंता ए. एम. राठोड, अजय धामोरे, पी.जी. बोरनार, दिपक पाटील, ए.एम. पाटील, आर. डी. ठाकरे हे उपस्थित होते.

https://www.facebook.com/508992935887325/videos/683206858964275

Protected Content