विरोधकांच्या गोंधळामुळे मतविभाजनाची मागणी नाकारली

नवी दिल्ली वृत्तसंस्था । राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांना कृषी विषयक विधेयकांवर राज्यसभेत मतविभाजन न करण्यावरून स्पष्टीकरण द्यावं लागलंय. २० सप्टेंबर रोजी कृषी विधेयकांना प्रक्रियेनुसार मंजूर करण्यात आल्याचं, हरिवंश यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटलंय. विरोधी पक्षांनी केलेली मतविभाजनाची मागणी मान्य करण्यात आली नाही कारण सदनात गोंधळ असल्याकारणानं व्यवस्था नव्हती, असंही हरिवंश यांनी म्हटलंय. उल्लेखनीय म्हणजे राज्यसभेत विरोधकांनी घातलेल्या गोंधळादरम्यान आवाजी मतदान घेऊन उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी कृषी विधेयकं मंजूर केली होती.

उपसभापतींनी हे स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की , ‘नियम आणि चलनानुसार मत विभाजनासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत. पहिली म्हणजे मत विभाजनाची मागणी केली जावी आणि सदनाचं कामकाज व्यवस्थितपणे पार पडावं, हेदेखील तितकंच महत्त्वाचं आहे’ असं हरिवंश यांनी म्हटलंय. ‘मी एका संविधानिक पदावर आहे आणि यामुळेच एक औपचारिक खंडन जाहीर करू शकत नाही. मी केवळ तत्थ्य तुमच्या समोर माडतोय आणि याचा निर्णय तुमच्या विवेकावर सोडून देतो’ असंही हरिवंश यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटलंय.

Protected Content