पाकिस्तानमधील भारतीय दूतावासातील दोन अधिकारी बेपत्ता

नवी दिल्ली, वृत्तसेवा । इस्लामाबादमध्ये भारतीय दूतावासाचं कार्यालय आहे. येथे कार्यरत असलेले दोन्ही अधिकारी बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती सोमवारी समोर आली आहे. या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयानं तातडीनं पाकिस्तानाकडे हा मुद्दा उपस्थित केला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनं भारतीय दूतावासातील दोन अधिकारी बेपत्ता झाले असल्याचे ट्विट केलं आहे. पाकिस्तानमधील इस्लाबाद येथे भारतीय दूतावास कार्यालय आहे. या कार्यालयात कार्यरत असलेले दोन अधिकारी सोमवारी अचानक बेपत्ता झाले. अधिकारी बेपत्ता झाल्यानंतर दोन तासांनी ही घटना समोर आली. या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयानं तातडीनं बेपत्ता अधिकाऱ्यांचा मुद्दा पाकिस्तानकडे उपस्थित केला आहे.

Protected Content