जळगावात महावितरणतर्फे झाडांच्या फांद्या तोडण्याची मोहीम सुरू

जळगाव प्रतिनिधी । पावसाळा नुकताच सुरू झाला असून विद्युत तारेला स्पर्श झालेल्या झाडाच्या फांद्या तोडण्याचे काम महावितरण कंपनीतर्फे जोरात सुरु आहे. गेल्या तीन दिवसांपासून रिंगरोड, खाजामिया परिसर , गणेश कॉलनी तसेच शहरातील विविध भागात विद्युत तारेकडे झुकलेल्या फांद्या तोडण्याची मोहीम महावितरण कंपनीने सुरू केली आहे.

शहरातील विविध भागात विद्युत तारेकडे झुकलेल्या फांद्या तोडण्याची मोहीम महावितरण कंपनीने सुरू केली आहे. परिणामी सकाळच्या सुमारास वाहनांची मोठी वर्दळ असल्याने वाहतुकीला काहीसा अडथळा निर्माण होत आहे. वन-वे ट्रॅफीक सुरू आहे. त्याचप्रमाणे काही झाडे पूर्णतः तोडण्यात येत आहे. जिवंत झाडे तोडण्यात येत असल्याने काही पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळा असल्यामुळे लोंबलेल्या फांद्यात विद्युत प्रवाह येऊ शकतो, जीवितहानी होऊ नये म्हणून फांद्या तोडण्याचे काम सुरू केले असल्याचे कर्मचारी एम.व्ही.पाटील यांनी प्रतिनिधीस सांगितले.

Protected Content