मुक्ताईनगर येथे पंडित दिनदयाल उपाध्याय जयंती साजरी

मुक्ताईनगर प्रतिनिधी । भारतीय जनसंघाचा पाया रचणारे पंडित दिनदयाल उपाध्याय यांची जयंती भारतीय जनता पक्ष कार्यालय मुक्ताईनगर येथे साजरी करण्यात आली यावेळी पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना एकनाथराव खडसे म्हणाले, पंडित दिनदयाल उपाध्याय हे तत्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते अस बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपले संपुर्ण जिवन मातृभूमीला समर्पित केले. जनसंघाची पाळेमुळे मजबूत करणाऱ्यांपैकी ते प्रमुख नेते होते. डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी यांच्यानंतर १६ वर्षे परिश्रमातून जनसंघाची उभारणी केली.

संपूर्ण जगात भांडवलशाही आणि साम्यवादावर वादविवाद सुरू होते तेव्हा याचा सूवर्णमध्य साधत पंडित दिनदयाल उपाध्याय यांनी एकात्म मानवतावाद मांडला. धर्म, अर्थ, काम मोक्षाकडे नेण्यासाठी असतात हा विचारही एकात्मवादात मांडला आहे.एकात्म मानवतावाद हा भारतीय संस्कृतीचेच रूप आहे. भारतीय जनता पक्षाची वाटचाल ही आजही पंडितजींनी मांडलेल्या एकात्म मानवतावादाच्या सिद्धांतावर सुरू आहे. भारतीय जनता पक्षाची प्रमुख घोषणा असलेली सबका साथ सबका विकास हि सुद्धा एकात्म मानवतावादातूनच आली आहे. मोदी सरकारने सुरू केलेल्या पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामिण कौशल्य योजना, मुद्रा बँक योजना,स्टार्टअप इंडिया, दिन दयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, मेक इन इंडिया या योजना सुद्धा एकात्म मानवतावादाने प्रेरीत होऊन निर्माण केल्या गेलेल्या आहेत यात सर्व जाती धर्म समाजातील शेवटच्या घटकाला लाभ मिळाला आहे

यावेळी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान संयोजक डॉ राजेंद्र फडके, माजी जि प अध्यक्ष अशोक कांडेलकर, तालुका अध्यक्ष रामभाऊ पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील,प स सभापती विद्याताई पाटील,नगराध्यक्षा नजमा ताई तडवी, जि प सदस्य वनिता गवळे, पं.स. सदस्य राजेंद्र सवळे, चंद्रकांत भोलाने, विनोद पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, माजी सभापती राजुभाऊ माळी,जेष्ठ कार्यकर्ते नारायणराव चौधरी,शिवराज पाटील, सुनिल काटे, कैलास पाटील, भागवत भोलाने, संजय तितुर, भैया पाटील, शुभम मूर्हेकर, कल्पेश पाटील, मयूर महाजन, पांडुरंग नाफडे उपस्थित होते.

Protected Content