सिंचन कामांमध्ये गौण खनिजाच्या वाहतुकीत कोट्यवधींचा घोळ : पल्लवी सावकारे ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील पाझर तलावांच्या कामांमध्ये गौण खनिजाच्या माध्यमातून कोट्यवधींचा घोळ करण्यात आला असून याची माहिती देण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी केला असून याबाबत त्यांनी आज जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.

भुसावळ तालुक्यातील कुर्‍हा-वराडसीम गटाच्या जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी जिल्हा परिषदेत आपल्या कामाची छाप पाडली असून अनेक घोटाळ्यांवर आवाज उठविला आहे. त्यांनी आता पाझर तलावांच्या कामांमध्ये गौण खनिजाच्या माध्यमातून मोठा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप केला आहे. यात त्यांनी विचारलेली माहिती देण्यास संबंधीत विभाग टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी करत याबाबत चौकशी करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना आज दिले. यात जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान आणि इतर योजनांसाठी लागणार्‍या गौण खनिज वाहतूक परवान्याची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना पल्लवी सावकारे यांनी अगदी लहान पाझर तलावांमध्येच सुमारे ५० लाखांचा भ्रष्टाचार करण्यात आला असून मोठ्या कामांचा विचार केला असता हा आकडा कोटींमध्ये असल्याचा आरोप केला. या सर्व प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचेही त्या म्हणाल्या.

खालील व्हिडीओत पहा पल्लवी सावकारे यांनी केलेले आरोप.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/653027728676876

Protected Content