सबजेलच्या बाहेर अज्ञातांकडून दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला

जळगाव प्रतिनिधी । सबजेलमध्ये असलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेल्या दोन तरूणांना अज्ञात हल्लेखोर चारचाकी वाहनाने येवून प्राणघातक धारदार शस्त्रांने हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यात दोघे तरूण गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा कारागृहात असलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेल्या रणजीत जिजाबराव इंगळे (२९, रा.असोदा रोड, जळगाव) व सनी बालकिसन जाधव (२४, रा.रामेश्वर कॉलनी) हे दोघे दुपारी आले होते. त्यावेळी बाहेर दोन तरुणांशी वाद झाला. त्यातून या तरुणांनी सनी व रणजीत यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. एकाला कानाजवळ तर दुसऱ्‍याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. हल्ला करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात सायंकाळपर्यंत गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती.

Protected Content