जळगाव न्यायालयाच्या आवारात वाहनधारकांना ‘ना’..!

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा न्यायालयाचे कामकाज यापुर्वीही आपत्कालीन खटले म्हणून सुरू होते. मात्र आजपासून न्यायालयात प्रवेश करणारे दुचाकी व चारचाकी वाहनांना न्यायालयाच्या आवारात प्रतिबंध करण्यात आल्याने परिसरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून आली.

न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर मास्क शिवाय प्रवेश बंद, सर्वांनी आरोग्य सेतू ॲपचा डाऊनलोड करावा, न्यायालयात प्रवेशासाठी प्रत्येकाने नोंदवहीत नोंदणी करणे, वकिल, पक्षाकार व कर्मचारी यांनी वाहने बाहेर लावावी अश्या स्वरूपाचे फलक लावण्यात आले आहे. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. न्यायालयात विविध केसेससाठी येणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. आपत्कालीन न्यायालय सुरू आहे. न्यायालयाच्या दोन्ही प्रवेशद्वाराजवळ पोलीस कर्मचारी विचारणा करूनच आतमध्ये सोडत आहे. असे दृष्‍य दिसून येत आहे.

Protected Content