शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ ‘टपाल’मध्ये मिळणार

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना तीन हप्त्यात दोन हजार रुपयांप्रमाणे वर्षाला ६ हजार रुपये अनुदान देण्यात येते. हे अनुदान आता गावातील टपाल कार्यालयातून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशी महिती अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी शुक्रवारी ३ मार्च रोजी दुपारी ४ वाजता पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन म्हणाले की,जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक आहे. यासाठी पोस्टमनच्या माध्यमातून गावातच सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यात सद्यस्थितीत १४ लाख ३२ हजार लाभार्थ्यांची बँक खाती आधार क्रमांकास जोडलेली नाहीत. यात जळगाव जिल्ह्यातील ३७ हजार ८८० लाभार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यात तेरावा हप्ता जमा होणार नाही. लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आयपीपीबीमार्फत उघडण्याची व ते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातील पोस्टमास्तरमार्फत करून दिली आहे. यासाठी आधार कार्ड व मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकतर्फे गावात येऊन ही सेवा देण्यात येणार आहे. यासोबतच ज्यांची खाते उघडलेली नाहीत, त्यांची खातेही उघडून घ्यावे असे आवाहन असेही अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी केले आहे.

Protected Content