शेत जमिनीचे ३२ वर्षापूर्वी भूसंपादन ; वृद्धाला न्यायाची प्रतीक्षा (व्हिडिओ)

पाचोरा, , लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील तारखेडा येथील वृद्ध शेतकऱ्याची शेत जमिन ३२ वर्षांपूर्वी लघु पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी धरणाचे कामासाठी संपादित करुन ताबा घेतला आहे. मात्र, याचा मोबदला शासनाने अद्यापही त्या शेतकऱ्याला दिलेला नाही. हा मोबदला लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी वृद्धाने केली आहे.

 

लघु पाटबंधारे विभागाने ३२ वर्षापूर्वी भूसंपादन करून देखील त्याचा मोबदला मिळत नसल्याने सुभाष रामलाल पाटील (वय – ६७) या वृद्धाने २६ जानेवारी २०२० रोजी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा पवित्रा घेतला होता. मात्र, वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करून वृद्धाची राज्यपालांच्या सचिवासोबत भेट घडवुन आणली असता या भेटीत राज्यपालांच्या सचिवांकडून संबंधित विभागाने या पत्रास केराची टोपली दाखवल्याने दोन महिने उलटुन ही शेतकऱ्यास न्याय मिळालेला नाही.सुभाष पाटील यांची तारखेडा शिवारातील गट क्रं. ३३७ / १ ही शेत जमिन लघु पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी धरणाचे कामासाठी दि. १ जुन १९९१ पासुन संपादित करुन ताबा घेतला आहे. मात्र त्याच्या नुकसानीचा अद्यापपर्यंत सुभाष पाटील यांना हक्काचा मोबदला मिळालेला नाही. दरम्यानच्या काळात सुभाष पाटील यांनी संबंधित विभागाशी वारंवार पत्र व्यवहार सुरू ठेवला. प्रसंगी उपोषण, आंदोलनासह सनदशीर मार्गाने त्यांचा लढा सुरूच ठेवला. मात्र गेंड्याची कातडी असलेल्या लघु पाटबंधारे विभागाने कुठलीच दखल न घेता सदरचे प्रकरण हेतुपुरस्सर प्रलंबित ठेवले आहे. दरम्यान सुभाष पाटील यांना त्यांची एस. टी. महामंडळामध्ये करत असलेली नोकरी देखील त्यांना या लढ्यापाई गमवावी लागली. त्यांचे अवघे कुटुंब रस्त्यावर आल्याची त्यांचेवर परिस्थिती ओढवली आहे. सुभाष पाटील यांनी न्यायासाठी दि. १० जानेवारी २०२२ ते दि. २३ जानेवारी २०२२ पर्यंत पाचोरा येथील लघु पाटबंधारे विभागा समोर पत्नी व मुलासह आमरण उपोषण केले होते. मात्र झोपेचे सोंग घेतलेल्या पाटबंधारे विभागाने त्याची कुठलीच दखल न घेतल्याने सुभाष पाटील यांनी थेट मंत्रालय गाठुन तेथे आत्मदहनाचा प्रयत्न केला असता वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करून सुभाष पाटील यांची राज्यपालांचे अवर सचिव जयराज चौधरी यांची भेट घालुन दिली असता अवर सचिव जयराज चौधरी यांनी सुभाष पाटील यांच्या प्रकरणा सखोल चौकशी करून संबंधित पाटबंधारे विभागास दखल घेण्यात यावी याबाबत पत्र दिले आहे. मात्र दिड महिना उलटुन ही शेतकऱ्यास न्याय मिळालेला नाही.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/483058206854097

 

Protected Content