बॉम्ब कुठे आहे ? मंत्री  धनंजय मुंडेंची विधानसभेत दंड थोपटत विरोधकांना विचारणा

मुंबई,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | रविवारी दुपारी मुंबई पोलिसांनी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सुमारे दोन अडीच तास चौकशी करून जबाब नोंदवण्यात आले, त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सोमवारी विधानसभा सभागृहात व्हिडीओ बॉम्ब फोडणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सोमवारी विधानसभेत हातवारे करताना मंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी विधिमंडळाचे सकाळच्या सत्रातील अधिवेशन सुरु असताना दंड थोपटून विरोधकांना केली.

सोमवारी 14 मार्च रोजी सकाळी विधिमंडळ अधिवेशनात जलसंपदा मंत्री जयंत पाटील विदर्भ पाटबंधारे महामंडळाविषयी बोलत होते. त्याचवेळी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे काहीही न बोलता हातवारे करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सभागृहात बॉम्ब फोडणार होते, काय झालं? बॉम्ब कुठे आहे, असा प्रश्न धनंजय मुंडे विचारला.

विरोधकांचा बॉम्ब कुठे आहे ?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यात सत्ताधाऱ्यांवर आरोप करणारा व्हिडिओ बॉम्ब विधानसभेत सादर केला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली. आठवड्याच्या अखेरीस माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी चौकशीवेळी राजकीय वातावरण तापले होते. पोलिस चौकशीनंतरही आगामी आठवड्यात आणखी बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी दिला होता. त्यामुळे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस विधानसभेत आज काय बोलतात, याकडे सत्ताधाऱ्यांसह महाराष्ट्राचं लक्ष होते. मात्र सोमवारी सकाळच्या सत्रात देवेंद्र फडणवीसांनी फार काहीही वक्तव्य केलं नाही. त्यामुळे विरोधकांचा बॉम्ब कुठे आहे, असा प्रश्न दंड थोपटून हातवाऱ्यांद्वारे धनंजय मुंडे यांनी केला. या वरून विरोधीपक्ष नेते कोणता बॉम्ब फोडतात याची उत्सुकता सत्ताधारी व विधिमंडळ सदस्यासह राजकीय वर्तुळात असल्याचे दिसून आले.

Protected Content