वैष्णवी महाजन यांच्या गरुड झेप स्पोर्ट्स अकॅडमी व सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशनतर्फे गौरव

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । डॉ. वैष्णवी महाजन यांनी गणित विषयात २६ व्या वर्षी पी.एच.डी. प्राप्त केली. या यशाबद्दल पाचोरा पोलिस स्टेशनच्या पी. एस.आय. विजया वसावे, शहरातील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संचालिका तथा बालरोग तज्ञ डॉ. प्रीती मगर, प्रसिद्ध व्याख्याते सचिन देवरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

शहरातील रहिवाशी स्वातंत्र्य सैनिक तथा पाचोरा न. पा. माजी ऑक्ट्राय इन्स्पेक्टर स्व. दामोदर महाजन यांची नात ध्येय करिअर अकॅडमीचे संचालक संदिप दा. महाजन व पाचोरा गो. से. हायस्कूलच्या इंग्रजी विषयाच्या उप – शिक्षिका शितल सं. महाजन यांची मोठी कन्या कु. डॉ. वैष्णवी संदीप महाजन हिने पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज मधून गणितात (A+) पदवी तर एम. एस. सी. (A+) तसेच बी. एड. (A++) यश प्राप्त करून गणित विषयात तिने जे. जे. टी. यु. येथून सर्टन इनव्हेस्टीगेशन आॅन अल्जेब्रिक स्ट्रक्चर आॅफ गृप्स अॅण्ड रिंग्स या विषयात संशोधन करून वयाच्या २६ व्या वर्षी पी. एच. डी. प्राप्त केली. गणित विषयात पाचोरा शहर व तालुक्यातून प्रथम तर उत्तर महाराष्ट्रात सर्वात कमी वयात डॉक्टरेट पी. एच. डी. प्राप्त करणारी पहिली कन्या ठरली आहे. कु. डॉ. वैष्णवी हल्ली पाचोरा येथील शेठ एम. एम. कॉलेज मध्ये सिनियर कॉलेजला गेल्या तीन वर्षापासून  गणित विभागाचे एच. डी. ओ. म्हणून कार्यभार सांभाळत आहे.

तिच्या या यशाबद्दल व कराटे असोसिएशन चे विध्यार्थी – विद्यार्थिनींनी कराटे कलर बेल्ट प्राप्त केल्याबद्दल पाचोरा पोलिस स्टेशनच्या पी. एस.आय. विजया वसावे, शहरातील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संचालिका तथा बालरोग तज्ञ डॉ. प्रीती मगर, प्रसिद्ध व्याख्याते सचिन देवरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सेन्साई – प्रकाश निकुंभ, राजेंद्र पाटील, रणजित पाटील, मधुसूदन पाटील, योगेश चित्ते आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेम्पाई – प्रवीण मोरे  यांनी केले. सूत्रसंचलन प्रकाश निकुंभ यांनी तर उपस्थितांचे आभार राजेंद्र पाटील यांनी मानले.

Protected Content