Home क्रीडा हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त बोहरा स्कूलमध्ये विविध क्रीडा स्पर्धा!

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त बोहरा स्कूलमध्ये विविध क्रीडा स्पर्धा!

0
3


पारोळा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एकमेव सी.बी.एस.ई. शाळा असलेल्या बोहरा सेंट्रल स्कूल, पारोळा येथे हॉकीचे जादूगार व पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम, संघभावना, शिस्त, आत्मविश्वास आणि देशप्रेमाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने शाळेच्या मैदानावर विविध क्रीडा उपक्रम व स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमप्रसंगी प्रारंभी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि त्यांच्या महान क्रीडा कारकिर्दीला मानवंदना देण्यात आली. या सोहळ्यास संस्थेचे चेअरमन सुरेंद्र बोहरा, शाळेच्या प्राचार्या रीयंका अरझारे, व्हाईस प्रिन्सिपल स्मिनीला, क्रीडा शिक्षक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रमुख उपस्थित होते. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून आयोजित विविध खेळांच्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मैदानावर आपल्या अफाट क्रीडा कौशल्याचे आणि संघभावनेचे दर्शन घडवून उपस्थितांची दाद मिळवली.
यावेळी क्रीडा शिक्षक प्रवीण जाधव, दिव्या तायडे व प्रतीक शिंदे यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे जीवनातील महत्त्व, क्रीडाभावना, शिस्त आणि मेजर ध्यानचंद यांच्या ऐतिहासिक कामगिरीची माहिती देऊन केवळ अभ्यासातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही सातत्याने प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित केले. बोहरा सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत विविध खेळांमध्ये यश संपादन केले असून, शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे क्रीडा क्षेत्रात शाळेचा आलेख उंचावत आहे. संस्थेचे चेअरमन सुरेंद्र बोहरा यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच खेळाडूवृत्ती जोपासून देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन करत राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
पारोळा येथील बोहरा सेंट्रल स्कूलमध्ये मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विविध मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, विद्यार्थ्यांनी क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन घडवले, तर संस्थाचालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात उत्तुंग यश मिळवण्यासाठी प्रेरित केले.


Protected Content

Play sound