दहा लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ; रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील विद्यानगर येथील माहेर असलेल्या विवाहितेचा शेती तसेच घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरुन दहा लाख रुपये आणावेत म्हणून छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या चार जणांविरोधात गुरुवार, ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, जळगाव शहरातील विद्यानगरातील कविता हेमंत सोळुंखे वय ३६ यांचा विवाह चोपडा तालुक्यातील देवगाव पारगाव येथील हेमंत प्रमोद सोळुंखे याच्याशी झाला आहे. लग्नानंतर काही दिवस चांगले गेल्यानंतर कविता हिने तिच्या माहेरुन घराचे कर्ज फेडण्यासाठी तसेच शेती घेण्यासाठी १० रुपये आणावेत अशी मागणी तिच्या पतीसह सासरच्या मंडळींनी कविता हिच्याकडे केली,  तसेच याच कारणावरुन वेळावेळी कविता हिला शिवीगाळ करत मारहाण केली, तसेच शारिरीक व मानसिक छळ केला, या छळाला कंटाळून कविता ही गुरुवारी ३१ ऑगस्ट रोजी माहेरी निघून आली व तिचे छळाबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन तिचे पती हेमंत सोळुंखे, सासू छाया प्रमोद सोळुंखे, प्रमोद विठ्ठल सोळंखे, नणंद पल्लवी प्रमोद साळुंखे सर्व रा. देवगाव पारगाव ता चोपडा या अशा चार जणांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण जगदाळे हे करीत आहेत.

Protected Content