भुसावळात हद्दपार आरोपीस अटक

haddpar aaropi atak

भुसावळ प्रतिनिधी । हद्दपार असूनही शहरात बेकायदेशीरपणे आलेल्या अजयसिंग उर्फ पापाराम रायसिंग पंडित या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना एक वर्षासाठी हद्दपार असलेला आरोपी अजयसिंग उर्फ पापाराम रायसिंग पंडित (वय-२५ रा.वाल्मिक नगर भुसावळ) हा शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती टिंबर मार्केट येथे बेकायदेशीर रित्या आला असल्याची माहिती मिळाली यावरून हद्दपार आरोपी यास सदर ठिकाना वरून ताब्यात घेण्यात आले असून त्याचे विरुद्ध भाग ६ गुरन ५४७/२०१९ मुंबई पोलीस कायदा कलम-१४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

संबंधीत कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजन राठोड व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. नेव्हील बाटली, रमण सुरळकर, पो.का. विकास सातदिवे व ईश्‍वर भालेराव यांच्या पथकाने केली.

Protected Content