Home राजकीय आजच्या राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष

आजच्या राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष

0
40

mahashiv aaghadi logo

मुंबई प्रतिनिधी । सोनिया गांधी यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर राज्यात महाशिव आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले असून याबाबत आजच्या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रदीर्घ बैठक झाल्यानंतर रात्री माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या दिशेने सकारात्मक पाऊल पडत असल्याचे सांगितले. या अनुषंगाने आज दोन्ही काँग्रेसची पुन्हा बैठक होणार असून शिवसेनेनेही आपल्या आमदारांना मुंबईत बोलावले आहे. यामुळे आता महाशिव आघाडीचे सरकार सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता याची नेमकी घोषणा केव्हा होणार आणि आज याबाबत काय घडामोडी होणार याकडे आता लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound