महसूलच्या संपामुळे सर्वसामान्यांचे झाले एप्रिल फुल

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – एप्रिलच्या पहिल्याच सोमवारी ४ एप्रिलपासुन महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला असून, या संपामुळे जिल्ह्याच्या मुख्यालयी सर्वत्र शुकशुकाट असून जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी यांचेसह केवळ वरिष्ठ अधिकारी उपस्थित असल्याने सर्व कामे ठप्प झाली आहेत. महसूलच्या संपामुळे कामानिमित्त बाहेरगावाहून आलेल्या सर्वसामान्य नागरिकाचे एप्रिल फुल झाले असल्याचे दिसून आले आहे.

महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना फार मोठा कालावधी होवूनही त्याबाबत शासनाकडून अद्यापपावेतो कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. मागण्या पूर्ण होण्याच्या दृष्टीने हा सर्वात महत्वाचा व अंतिम टप्पा असल्याने ४ एप्रिलपासुन महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या बेमुदत संपात जिल्ह्यातील सर्व पंधरा तालुके, सात उपविभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांमधील सर्व महसूल कर्मचारी सहभागी झालेले आहेत. आंदोलनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करुन, घोषणा देण्यात येवून संघटनेच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले. या संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात केवळ वरिष्ठ अधिकारी वगळता अन्यत्र शुकशुकाट दिसून आला.

Protected Content