संक्रमण गावापर्यंत न पोहचू देणे, हे मोठे आव्हान : मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आम्ही नागरिकांना जिथे आहात, तिथेच राहण्यास सांगितले होते. पण, अनेकांना आपल्या घरी जायचे आहे. यामुळे आम्हालाही आमचे काही निर्णय बदलावे लागले. पण, संक्रमण गावापर्यंत न पोहचू देणे, हे मोठे आव्हान असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी केले. पंतप्रधान मोदी देशातील वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांशी आज संवाद साधत आहेत.

 

 

व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ही बैठक होतेय. लॉकडाऊन दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधानांची ही पाचवी बैठक आहे. लॉकडाऊन सुरू होऊन ४७ दिवस पूर्ण झालेत. देशात उद्यापासून लॉकडाऊन विशेष रेल्वेही सुरू होणार आहेत. श्रमिकांसाठीही विशेष रेल्वे सुरूच आहेत. येत्या १७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा कालावधी पूर्ण होतोय. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांशी आज संवाद साधत आहेत. दरम्यान, बैठकीदरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी आरोग्य सेतू अॅपच्या वापरावर भर दिला. ते म्हणाले की, नागरिकांनी हे अॅप डाउनलोड करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावे, असे संगीतले. ही बैठक दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत चालणार आहे.

Protected Content