Home क्राईम जम्मू-काश्मीरमध्ये चकमक ; दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक ; दोन दहशतवादी ठार

0
100


D724tzbUcAAGYEi
 

शोपियान (वृत्तसंस्था) दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दहशतवादी ठार झाले आहेत. आज सकाळी दारगाड सुगन परिसरात ही चकमक झाली.

 

शोपियानमधील सुगान परिसरात भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स (आरआर), सीआरपीएफ आणि एसओजीने मिळून सर्च ऑपरेशन सुरु केले होते. त्यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. दरम्यान, या भागातील चकमक अद्यापही सुरु असल्याचे कळते. याआधी गुरुवारी बारामुला जिल्ह्यातील सोपोरमधील डांगरपोरा येथे चकमकीत भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound