रेल्वेचे दुय्यम दर्जाचे काम बंद करा ; कामगार सेनेची पालकमंत्र्यांकडे मागणी

 

भुसावळ, प्रतिनिधी । आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची रेल कामगार सेनेच्या शिस्टमंडळाने भेट घेऊन भुसावळ रेल्वेतील लॉक डाऊन संदर्भात चर्चा करून लॉक डाऊन संपेपर्यंत इमर्जन्सी वगळता व रेल्वे बोर्डाच्यां आदेशाचे पालन करत बाकीचे दुय्यम दर्जाचे रेल्वेचे कार्य बंद करावे अशी मागणी करण्यात आली.

देशात व राज्यात लॉक डाऊन सुरु असले तरी रेल्वेतील पीओएच, एमओएच , ट्रॅकमॅन-इंजीनियरिंग , डिसीओएस , डीआरएम कार्यलय व इतर ठिकाणी ड्यूटी सुरु आहे.याबाबत कर्मचारी यांची तीव्र स्वरूपाची समस्या मांडण्यात आली. यात जिल्हाधिकारी यांनी भुसावळ ऑरेंज झोनमध्ये असतांना कारखाना सुरु करण्याची परवानगी दिली होती. मात्र, आता भुसावळ रेड झोनमध्ये आलेला असतांना पीओएच कारखाना व एमओएच शेड हे नियंत्रण क्षेत्रा जवळच हाकेच्या अंतरावर असून तरी सुद्धा पीओएच कारखाना सुरू करण्यात येत आहे व एमओएच ,पीओएच, डिसीओएस ,डीआरएम कार्यालय , इंजीनियरिंग व इतर ठिकाणी काम करणारे कर्मचारी हे एकमात्र रस्त्यावरून ये-जा करणार आहेत. हे कर्मचारी शहरातील विविध परिसरातील रहिवासी एकमात्र रस्त्यांवरून ये- जा करीत आहेत. जेष्ठ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असतांना ५० वर्ष वयोगटातील कर्मचाऱ्यांना सुद्धा ड्युटीवर बोलविण्यात येत आहे. काही विभागाना रेल्वे क्षेत्रातील दुय्यम स्थानचे आहे. महाराष्ट्रातील बहुतेक रेल्वेचे कारखाने बंद आहेत. आणि जिल्ह्यासह भुसावळची परिस्थिती गंभीर होवु शकते म्हणून पीओएच कारखाना पूर्णत: बंद करावा अशी मागणी करण्यात आली. रेल्वे दवाखान्याची परिस्थिती व काय उपाययोजना व काही कमतरता आहे ते पहाणी करण्यासाठी लवकरात लवकर रेल्वे दवाखान्याला भेट द्यावी अशी विनंती शिष्टमंडळाने केली. ना. गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडलला दिले. बऱ्याच ठिकाणी रेल्वे कामगारांना कोरोना प्रतिबन्धक वैद्यकीय सामग्री पुरेस्या प्रमाणात देण्यात येत नाही-आलेली नाही . सोशल डिस्टन्सची पूर्ण ऐसी-तैसी झालेली आहे.एमओएच मध्ये ड्युटीवर येतांना त्रास सहन करावा लागत आहे. यात पोलिसांचा देखील त्रास होतो. काही कामगार कोरोना पॉझिटिव्ह भागात राहतात त्यांना देखील ३ शिफ़्टमध्ये ड्युटीवर बोलविले जात आहे. पीओएच कारखाना सुरू झाला तरी आम्ही चालू झाल्यावर कारखाना बंद करण्याचे प्रयत्न नक्की करू. जोपर्यंत भुसावळ मधुन कोरोना हद्दपर होत नाही तोपर्यंत व लॉक डाऊन संपेपर्यंत इमर्जन्सी वगळता व रेल्वे बोर्डाच्यां आदेशाचे पालन करत बाकीचे दुय्यम दर्जाचे रेल्वेचे कार्य बंद करावे अशी मागणी करण्यात आली आहे. शिस्टमंडळात रेल कामगार सेना , भुसावल विभाग मंडल अध्यक्ष ललितकुमार मुथा , मंडल कार्याध्यक्ष प्रितम टाक , मंडल उपाध्यक्ष अरविंद थोरात आदींचा समावेश होता.

Protected Content