विवाहिता आत्महत्या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकासह तिघांना अटक करा; महिला आरोगाकडे तक्रार

जळगाव प्रतिनिधी । पत्नीने गोळी झाडून आत्महत्या केल्याप्रकरणी गडचिरोली पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात फौजदारासह आई, वडील आणि प्रेयसी या चौघांना अटक करावी आणि सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागपूर येथील ‘वी फॉर चेन्ज’ या महिलांसाठी लढणारी संघटनेने महिला आयोगाकडे केली आहे.

पत्नीच्या आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले गडचिरोली पोलीस दलात कार्यरत असलेला फौजदार धनराज बाबुलाल शिरसाठ (मुळ रा.वराड, ता.धरणगाव), त्याची प्रेयसी महिला पोलीस कॉन्स्टेबल व धनराजचे वडील बाबुलाल नामदेव शिरसाठ,आई सुशिलाबाई या चौघांना अटक करावी व या प्रकरणासह आणखी इतर प्रकरणांची खोलात जावून चौकशी करावी अशी मागणी नागपूर येथील ‘वी फोर चेंज’ या महिलांसाठी लढणारी संघटनेने महिला आयोगाकडे केली आहे.

गडचिरोली पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर असलेल्या धनराज शिरसाठ याची पत्नी संगीता हिने ७ मे रोजी दुपारी १ वाजता पोमके, ता.मुलचेरा येथे एके-४७ या रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती. मुलचेरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाºयाशी असलेल्या प्रेमसंबंधामुळे शिरसाठ संगीता हिला घटस्फोटासाठी त्रास देत होता, त्यातून संगीता हिने आत्महत्या केल्याची फिर्यादी भाऊ गणेश दगडू सपके (लक्ष्मी नगर, जळगाव) याने दिली आहे. त्यावरुन चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.   ‘वी फॉर चेन्ज’ संघटनेच्या समन्वयक रश्मी पारसकर यांनी महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीत अनेक गंभीर प्रकरणांचे लक्ष वेधले आहे.

Protected Content