बोलण्यात मधुरता आणि डोक शांत ठेवा – जयप्रकाश काबरा   

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | विद्यार्थ्यांनी नेहमी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे जेणेकरून यश प्राप्त होईल. नकारात्मकता दूर करा व नेहमी सकरात्मक रहा. आपल्या बोलण्यामध्ये मधुरता ठेवा व डोकं नेहमी शांत ठेवा असे केल्याने कामात कुठलीही अडचण येत नाही, असे प्रतिपादन मोटिवेशनल वक्‍ते जयप्रकाश काबरा यांनी केले.

गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च जळगाव व रोटरी क्लब ऑफ गोदावरी ३०३० यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेमध्ये प्रसिद्ध मोटिवेशनल वक्ते व मॅनेजमेंट कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेडचे जयप्रकाश काबरा यांनी विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट – यसटर्डे, टूडे आणि टुमारो या विषयावर व्याख्यान दिले. सर्वप्रथम महाविद्यालयाचे संचालक डॉ.प्रशांत वारके यांनी जयप्रकाश काबरा यांचे शाल, श्रीफळ व स्मृतचिन्ह देऊन स्वागत केले.

मोटिवेशन, बिहेव्हीयर

यावेळी उपस्थितांना संबोधताना जयप्रकाश काबरा यांनी सांगितले की, टिचर इज ऑलवेज अ टिचर, कारण विद्यार्थ्यांना नेहमी ज्ञान देण्याचे काम शिक्षकाचे चालूच असते. त्यासाठी निरंतर वाचन शिक्षकांना करावे लागते. खरे मॅनेजमेंट गुरू हे आर्य चाणक्य आहेत ज्यांनी चाणक्य नीति मध्ये मोटिवेशन, बिहेव्हीयरबद्दल सर्व लिहिले आहेत. मॅनेजमेंट हे एक अफाट मोठे क्षेत्र असल्याचे काबरा यांनी सांगितले.

नेहमी प्रयत्न करा

जगामधील सर्वात उत्कृष्ट व्यवस्थापक ही स्त्री आहे. जी घर सांभाळते, त्यांचे वेळेचे व्यवस्थापन चांगले असते, समस्या सोडवित असते. मैदान सोडून कधीही पळू नका. ऐकावे जनाचे करावे मनाचे. आव्हानांना नेहमी धैर्याने तोंड द्या असे सांगत काबरा यांनी मुंंगीचे उदाहरण दिले. जसे एक छोटी मुंगी आपल्या वजनाच्या दहापट वजन उचलते. उचलताना ते पडते, ती पुन्हा उचलते असे चालू असते. त्याप्रमाणे नेहमी प्रयत्न करा तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होईल, असेही जयप्रकाश काबरा म्हणाले.

कार्यक्रमास महाविद्यालयाच्या डेप्युटी डायरेक्टर डॉ.नीलिमा वारके यांच्यासह सर्व शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची उपस्थिती होती. तसेच एमबीए, बीसीए, बीबीएच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्राजक्ता पाटील यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. मिताली शिंदे यांनी केले.

मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण

या कार्यक्रमाचे औचित्य साधून जयप्रकाश काबरा व रोटरी क्लबच्या सदस्य यांच्या हस्ते महाविद्यालयाजवळ सामाजिक बांधिलकी अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली. यात प्रामुख्याने वड,पिंपळ, कडुनिंब झाडांचा समावेश होता. या कार्यक्रमास निर्मला काबरा, रोटरी क्‍लब इलाईट जळगावचे डॉ.पंकज शाह, सचिव निलेश झवर, राजीव बियाणी, सचिन चौधरी, संदीप असोदेकर, श्रीराम परदेशी उपस्थित होते.

Protected Content