फैजपूर शहरात निर्जंतूकीकरणासाठी सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी

फैजपूर प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून फैजपूर नगरपालिकेच्या वतीने शहरातील सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात येत आहे.

यावेळी नगराध्यक्ष महानंदा होले, उपनगराध्यक्ष रशीद तडवी मुख्याधिकारी किशोर चव्हाण, जेष्ठ नगरसेवक हेमराज चौधरी, नगरसेवक शेख कुर्बान, जितेंद्र भारंबे व नगरसेवक यांच्या पुढाकाराने पालिकेतर्फे शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणी निर्जंतूकीकरण करण्यात येत आहे.

प्रशासनाच्यावतीने टँकरमध्ये टाकून ब्लिंचीग आणि सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी केली जात आहे. शहरातील प्रत्येक वार्डातील गल्लीबोळात फवारणीसाठी तीन नवीन हँड पंप उपलब्ध केल्याने प्रत्येक वार्डातही फवारणी केली जात आहे. देशभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजविला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने उपाययोजना म्हणून निर्बंध लादले आहे. शासकीय कार्यालये, बसस्थानक, सार्वजनिक ठिकाणी ब्लिंचीग आणि सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात येत आहे. किराणा दुकान बँका यांच्या समोर एक मिटरचे सुरक्षित अंतर (सोशल डिस्टन्स) चा प्रभाव जाणवला नागरिक आखून दिलेल्या चौकटीतच व्यवहार करीत होते.असे असतांना शहरातील गल्लीबोळामध्ये नागरिकांना या आजार विषयीचे गांभीर्य दिसत न होते.गल्लीबोळात नागरिक घोळक्याघोळक्याने उभे होते. यावरही पोलिसांनी कडक पाऊले उचलावी. अन्यथा फैजपूर शहरातील परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही.

Protected Content