यावल आगारातून परप्रांतीयांना घेवून बस रवाना

यावल प्रतिनिधी – गेल्या दोन महिन्यांपासून अडकलेल्या परप्रांतियांना यावल आगारातून १४ जणांना बस मध्यप्रदेश जाण्यासाठी चोरवड सिमेपर्यंत सोडण्यासाठी रविवारी रात्री रवाना झाली.

गेल्या दोन महिन्यांपासून परप्रांतियांवर उपासमारीची वेळ आली आहे. हाताला काम नसल्याने त्यांनी आपआपल्या मुळ गावी जाता यावे याकरीता यावल बस आगारातर्फे १२ मे पासुन एसटी बस व्दारे मोफत त्यांच्या गावाच्या सिमारेषेवर सोडण्यात येत आहे. यावल आगारातुन सुमारे १८ एसटी बसेस या परप्रांतीयांसाठी सोडण्यात आल्यात रविवारी १७ मे रोजी परप्रांतीयांना मोफत सोडण्यात येत असलेल्या मुदतीचा आज शेवटा दिवस होता दरम्यान यावल आगारातुन गोवा येथुन मागील ८ दिवसांपासुन पायदळी प्रवास करीत येत असलेल्या उतरप्रदेशचे १४ कामगार प्रवासी घेवुन रात्री ७.४० वाजता शेवटी बस मध्यप्रदेशच्या चोरवड सिमारेषेवर रवाना झालीृ

यांची होती उपस्थिती
यावेळी तहसीलदार जितेन्द्र कुवर, नोडल अधिकारी दिनेश कोते, सहाय्यक नोडल अधिकारी रविन्द्र आर. पाटील, यावल आगाराचे प्रभारी आगार व्यवस्थापक एस.व्ही. भालेराव, आगार निरिक्षक जि.पी. जंजाळ, वाहतुक नियंत्रक संदीप अडकमोल, विकास करांडे, डॉ. अमोल रावते यांच्यासह पत्रकार अय्युब पटेल, सुरेश पाटील, सुनिल गावडे, ज्ञानदेव मराठे, तेजस यावलकर यांनी देखील हे प्रवासी मध्यप्रदेशच्या सिमेवर सुखरूप पहोचावे याकरीता प्रशासकीय प्रयत्न केले.

Protected Content