चोपडा पालिकेतर्फे डॉक्टरांना पीपीई कीटचे वाटप

चोपडा प्रतिनिधी । चोपडा नगरपरिषदतर्फे शहरातील डॉक्टरांना पीपीई कीट आणि मास्कचे नगराध्यक्ष जीवन चौधरी यांच्याहस्ते वाटप करण्यात आले.

चोपडा नगरपरिषदेच्या वतीने व गटनेते जिवन चौधरी यांच्या उपस्थितीत शहरातील डॉ. अय्यूब पिंजारी, डॉ. फिरोज सैय्यद यांच्यासह इतर ११ डॉक्टरांना पीपीई कीट, सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी मुक्तार सरदार, अकिल जागीरदार, नौमान काजी, शहबाज खान, युनुस खान, जाकीर शेख आदी उपस्थित होते. यावेळी सर्व डॉक्टरांनी दवाखाने उघडल्याबद्दल डॉक्टरांचे अभिनंदन करण्यात आले.

Protected Content