कुंभारखेडा येथे श्रीमद् दशावतार कथा व संकीर्तन सप्ताह

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील कुंभारखेडा येथे 6 ते 13 एप्रिल या कालावधीत श्रीमद दशावतार कथा व कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

कुंभारखेडा येथील राम कृष्ण हरी भजनी मंडळ व समस्त गावकरी मंडळीच्या सहकार्याने महामंडलेश्वर संतपथाचार्य जनार्दन हरिजी महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतुन भव्य सजीव देखावा सह सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे.

यात दैनंदिन कार्यक्रम सकाळी ५ ते ६ काकडा आरती, ६ ते ७ विष्णू सहस्त्रनाम , दुपारी १२ ते ५ श्रीमद् दशावतार कथा , सध्या काळी ६ ते ७ हरिपाठ  रात्री ८ ते १० किर्तन होईल तर दररोज दि ६ रोजी कथेत मत्स्य अवतार भक्त रूक्मानद  चरित्र तर रात्री ज्ञानेश्वर महाराज यांचे किर्तन ,दि ७ रोजी वराह अवतार , भक्त प्रल्हाद चरित्र रात्री प्रल्हाद शास्त्री , सिन्नर यांचे किर्तन, दि ८ रोजी वामन अवतार भक्त कमळाबेन चरित्र परशुराम चरित्र, श्री राम जन्मोत्सव रात्री हरिदास महाराज, दि. ९ रोजी सिता स्वयमवर, भक्त शबरी चरित्र रावण वध , श्रीकृष्ण जन्मोत्सव रात्री दिपक महाराज धरणगाव दि १० रोजी श्रीकृष्ण चरित्र, रुक्मिणी स्वयंवर रात्री रामेश्वर महाराज आळंदी, दि. ११ रोजी संपूर्ण महाभारत , बुद्ध अवतार चरित्र , रात्री डॉ जलाल महाराज करंजीकर ,दि १२ रोजी भक्त पांडवांचे स्वरगारोहण, भक्त सुदामा चरित्र व निष्कलंकी अवतार चरित्र रात्री विजय महाराज मुक्ताईनगर, दि १३ रोजी सकाळी ९ ते ११ काल्याचे किर्तन हभप तुकाराम महाराज चिचोल दुपारी १२ ते ५ महाप्रसादाचे आयोजन तर सध्या ६ वाजता दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कथेला परिसरातील टाळकरी ,विणेकरी ,गायक व भजनी मंडळाचे सहकार्य लाभणार आहे. सदर सत्संगाचा परिसरातील भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन कुंभारखेडा येथील राम कृष्ण हरी भजनी मंडळ व कुंभारखेडा ग्रामस्थांनी केले आहे. कुंभारखेडा येथे संगीतमय श्रीमद् दशावतार कथा आयोजन सोहळ्यात महामंडलेश्वर श्री जनार्दन जी महाराज यांचे शुभाशिर्वाद आमदार शिरीष चौधरी, विलास ताठे, प्रगतीशील शेतकरी, अशोक पाटील, मुरलीधर राणे व जगन्नाथ विठ्ठल पाटील सह अनेक मान्यवर मंडळी यावेळी उपस्थितीत होते.

 

Protected Content