Home Cities जळगाव खान्देश कन्या महिला मंडळातर्फे वृक्षांचा वाढदिवस साजरा (व्हिडिओ)

खान्देश कन्या महिला मंडळातर्फे वृक्षांचा वाढदिवस साजरा (व्हिडिओ)

0
37

जळगाव, प्रतिनिधी ।  खान्देश कन्या महिला मंडळातर्फे रायसोनी नगरात वृक्षांचा तिसरा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. 

खान्देश कन्या महिला मंडळाच्या अध्यक्ष मंगला बारी यांच्या संकल्पेतून रायसोनी नगर व मोहाडी रस्ता येथे तीन वर्षापूर्वी वृक्षारोपण करण्यात आले होते. मंडळातर्फे या  झाडांचे उत्तम देखभाल व संगोपन करण्यात येत आहे.  आज या झाडांचा तिसरा वाढदिवस त्यांना साडी चोळी नेसवून त्यांची ओटी भरून औक्षण करत साजरा करण्यात आला.यावेळी झाडे लावा झाडे जगवा चा संदेश देण्यात आला.  कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्व सर्वाना कळाले असून सर्वांनी वृक्षरोपण करावे असे आवाहन  मंडळाच्या अध्यक्षा मंगला बारी यांनी केले. यावेळी त्यांच्या सोबत छाया बारी, पूनम बारी,  सुनिता पाटील, कांचन पाटील, वंदना पाटील, मोहिनी चौधरी, भारती पाटील सोनी भंगाळे, पूजा जैन व छाया पाटील आदी उपस्थित  होत्या. 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1677454125782235

 


Protected Content

Play sound