चैतन्य तांडा येथे विविध विकासकामांचे लोकार्पण

चाळीसगाव, प्रतिनिधी ।  तालुक्यातील चैतन्य तांडा येथे लोक सहभाग व जल शक्ती अभायान अंतर्गत शंभर टक्के डासमुक्त गाव झाल्याने या पार्श्वभूमीवर विविध विकास कामांचे लोकार्पण जि.प.सदस्य पोपट तात्या भोळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. 

 

लोक सहभाग व जल शक्ती अभायान अंतर्गत शंभर टक्के डासमुक्त गावाबरोबर १४ व्या वित्त आयोगाच्या विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळ्याचे आयोजन तालुक्यातील चैतन्य तांडा येथे शनिवारी करण्यात आले.   कार्यक्रम हा जि.प.सदस्य तात्या भोळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक माजी चेअरमन दिनकर राठोड यांनी केले. दरम्यान गावात एकूण २५० कुटुंब हे वास्तव्यास  असून  सरपंच अनिता दिनकर राठोड व उपसरपंच आनंदा राठोड आहेत. गावात विकासात्मक १४ वा वित्त आयोगाच्या निधीतून गावात ५ लाखाचे कॉंक्रीटीकरण, आमदार निलय नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून ३ लाखांचा प्लेव्हर  ब्लॉग (संगम हॉटेल समोर), खासदार यांच्या विकास निधीतून ३ लाखांचा प्लेव्हर ब्लॉग, तसेच लोकवर्गणीतून गावात २०० कुटुंबाचे सौच खड्डे करण्यात आले आहे. उर्वरीत ५० सौच खड्डे हे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी मनरेगा योजनेअंतर्गत बांधून दिले आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या काळात विनामास्क फिरणाऱ्यावर  केलेल्या दंडात्मक कारवाईतून एकूण ७० हजार महसूल ग्रामपंचायतीला प्राप्त झाला आहे.  या कार्यक्रमाप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण यांनी शिवनेरी फाऊंडेशन अंतर्गत चैतन्य तांड्यात विविध विकास कामे करण्यात आली आहे. शौच खड्डा असो की जलसंधारण याचा फायदा गावातील ग्रामस्थांना झालेला आहेत. त्यामुळे चैतन्य तांडा हा डासमुक्त गाव म्हणून तालुक्यातील पहिला मानकरी तर आहेच परंतु शासकीय योजनेचा लाभातही प्रथम गाव ठरला आहे. हे फक्त दिनकर राठोड यांच्या अथक परिश्रमातून हे कार्य सुरू आहेत. ग्रामस्थांनी योग्य व्यक्तीच्या हातात नेतृत्व दिल्यामुळेच विकासात्मक बाबी घडत असल्याचे सुतोवाच आमदार चव्हाण यांनी केले. तसेच गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी चैतन्य तांड्याला मनरेगा योजनेअंतर्गत आदर्श गाव बनवण्याचे निर्धार केले असल्याचे सांगितले. यावेळी आमदार मंगेश चव्हाण, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, जि. प. सदस्य पोपट तात्या भोळे, माजी सभापती दिनेश बोरशे, जि.प. सदस्य मंगला भाऊसाहेब जाधव, माजी उपसभापती संजय भास्कर पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील निकम, माजी महिला आघाडी तालुकाध्यक्ष्या नमोताई राठोड व तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्रसिंग राठोड (सांगवी), संजीव राठोड (वलठान), गोरख राठोड (जुनोने), गोरख राठोड (शिंदी), कैलास राठोड (तळोंदा), साहेबराव राठोड (माजी सरपंच तळोंदा), अनिल चव्हाण (लोंजे), गुलाब राठोड (बोढरे), अर्जून राठोड (उपसरपंच बोढरे), किसनराव जोर्वेकर (उपसरपंच टाकळी प्र.चा), शाम सोनवणे (कळमडू सदस्य), किरण देवरे (करगाव), विकास सोसायटीचे चेअरमन बाबुराव मराठे (करगाव), मनीषा पाटील, गजानन चौधरी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/164799202364782

 

Protected Content