पुलवामा हत्याकांड एनआयएचे आरोपपत्र न्यायालयात ; इन्शा जान अतिरेक्यांची स्थानिक सहकारी

नवी दिल्ली. वृत्तसंस्था । पुलवामा येथे आत्मघातकी हल्ला करणाऱ्या ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या दहशवाद्यांना २३ वर्षांची स्थानिक तरुणी इन्शा जान हिने विविध प्रकारची मदत केल्याचा खुलासा एनआयए ( राष्ट्रीय तपास संस्था ) ने दाखल केलेल्या आरोपपत्रात करण्यात आला आहे.

इन्शा जान ही बॉम्ब तयार करणारा आणि हल्ल्याचा कट रचणारा प्रमुख पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद उमर फारूख याची सहकारी होती. ती फोनद्वारे, इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत उमर फारूखच्या संपर्कात होती.सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मचा वापर करून इंशाने केलेल्या चर्चेचा तपशील एनआयएने मिळवला आहे. ही बाब एनआयएने आरोपपत्रात नमूद केली आहे. इंशा जानचे वडील तारीक पीर यांना देखील दोघांमधील संबंधांबाबत माहिती होती. तारीक पीर याने कथित स्वरुपात पुलवामा आणि आसपासच्या परिसरात मोहम्मद उमर फारूख आणि त्याच्या दोन साथीदारांच्या हालचालींसाठी मदत केली होती.

इन्शा जान नेहमीच भारतीय सुरक्षादलांच्या हालचालींबाबतची सर्व माहिती उमर फारूखला देत असे . उमर फारूख हा जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याचा भाचा होता मसूद अजहरचे नाव देखील पुलवामा हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार म्हणून आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

इन्शाच्या घरीच थांबले होते दहशतवादी, वडिलांचीही साथ

पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी इंशाच्या घरी एकदा दोन ते चार दिवसांसाठी सन २०१८ आणि सन २०१९ या दरम्यान राहिले होते, पिता तारीक पीर आणि कन्या इंशा जान, दोघांनीही मोहम्मद उमर फारूख, समीर डार आणि आदिल अहमद डार यांना १५ हून अधिक वेळा जेवण, आसरा आणि इतर सुविधा दिल्या होत्या.

एनआयएने १९ लोकांना आरोपी बनवले आहे. त्यातील ७ दहशतवादी एनआयएच्या कोठडीत आहेत, तर ७ मारले गेले आहेत. एकूण ५ दहशतवादी फरार आहेत. इंशा जान आणि शकीर बशीर यांच्या घरात बॉम्ब तयार करण्याचे काम होत होते, असे एनआयएने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

Protected Content