लवकरच कुठूनही मतदान करण्याचा हक्क मिळणार?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारतीय निवडणूक आयोग एक महत्तपूर्ण पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. देशातील कोणत्याही मतदान केंद्रावर जाऊन मतदारांना मतदान करता येणं शक्य आहे का?, याची चाचपणी सध्या निवडणूक आयोग करत आहे.

ज्या मतदारसंघात आपलं नाव आहे किंवा नोंदणी आहे तिथे जाऊन आपल्याला मतदान करावं लागतं. नोकरी करणाऱ्यांना किंवा कामानिमित्त बऱ्याच वेळा बाहेर असणाऱ्या मतदारांना मतदान करणं जमतं असं नाहीच. मात्र आता भारतीय निवडणूक आयोग एक महत्तपूर्ण पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. देशातील कोणत्याही मतदान केंद्रावर जाऊन मतदारांना मतदान करता येणं शक्य आहे का?, याची चाचपणी सध्या निवडणूक आयोग करत आहे.

देशातील कोणत्याही मतदानकेंद्रावर जाऊन मतदाराला आपलं मत नोंदवता येण्यासाठी भारताच्या निवडणूक आयोगाचं काम सुरु आहे किंबहुना त्याची ट्रायल सुरु असल्याचं भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितलं. राष्ट्रीय मतदार दिनाच्या पूर्वसंध्येला सुनील अरोरा यांनी भविष्यातील निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा दृष्टीकोन देशवासियांच्या समोर ठेवला.

आम्ही आयआयटी-मद्रास आणि इतर संस्थांसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रिमोट वोटिंग संधोधन प्रकल्प सुरु केला आहे. आमचा हा प्रकल्प प्रगतीपथावर असून त्याची ट्रायलही सुरु झाल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितलं.

प्रत्येक निवडणुकीत हजारो लोकांना भौगोलिक अडथळ्यामुळे, व्यवसाय, शिक्षण, वैद्यकीय उपचार किंवा इतर कारणांमुळे नोंद असलेल्या मतदारसंघात जाता येत नाही. अशा मतदारासांसाठी निवडणूक आयोगाचा हा निर्णय संजीवनी ठरणार आहे. देशातील लाखो मतदारांना याचा फायदा होणार आहे. जर देशातील कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करण्याचा अधिकार बजावता आला, तर मतदानाची टक्केवारीही वाढण्यास मदत होणार आहे.

भारत निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० ला करण्यात आली. याचं दिनाचं औचित्य साधून निवडणूक आयोग दरवर्षी २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन साजरा करतो. आजपासून भारत निवडणूक आयोगाचे ई मतदार ओळखपत्र वाटप सुरु होणार असून मतदारांना त्यांचे ओळखपत्र मोबाईल अथवा संगणकावर डाऊनलोड करता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त बलदेस सिंह यांनी दिली

Protected Content