भरधाव ट्रकने विद्यार्थिनीला चिरडले ; मृतदेहाचे अक्षरशः दोन तुकडे

dhule1234 1

 

धुळे (प्रतिनिधी) शिकवणीसाठी सायकलवर जात असलेल्या विद्यार्थिनीला एका भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना आज सकाळी घडली. अपघात एवढा भयंकर होता की, मृत विद्यार्थिनीच्या शरीराचे अक्षरशः दोन तुकडे झाले होते.

या संदर्भात अधिक असे की, गुंजन देवीदास पाटील (वय 14 वर्षे) ही विद्यार्थिनी आज सकाळी सात वाजेच्या सुमारास शिकवणीस आपल्या सायकलवरून जात होती. शहरातील साक्री रोडवर सिंचन भवनानजीक अचानक ट्रक क्र. (जी.जे. 01 सीवाय 0267) या भरधाव ट्रकने तिला चिरडले. यात सायकल आणि गुंजनच्या शरीराचे दोन तुकडे झाले. स्थानिक नागरिकांनी झाडाच्या पाल्याने मृतदेह झाकला. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी तणावाचे वातारवण निर्माण झाले होते. परंतू घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Protected Content