Home क्राईम योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास मुंबईतून अटक

योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास मुंबईतून अटक

0
158

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी दिल्याप्रकरणी एका तरुणाला मुंबई एटीएसने अटक केली आहे. कामरान खान असे त्याचे नाव असून त्याला चुनाभट्टी परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

 

कामरानने उत्तर प्रदेश सरकारच्या सोशल मीडिया हेल्प डेस्कवर फोन करुन, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना बॉम्ब हल्ल्यात मारलं जाणार आहे अशी धमकी दिली होती. यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी लखनऊ मधील गोमती नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने तपास केला असता ज्या मोबाईल नंबरवरुन धमकीचा फोन करण्यात आला तो मुंबईतला असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांना याविषयी माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासचक्र फिरवीत कारवाई करत कामरानला अटक केली आहे. कामरानने आपला एटीएस अधिकाऱ्यांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. रविवारी कोर्टासमोर सादर करण्यात आल्यानंतर कामरानला उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या ताब्यात देण्यात येणार आहे. दरम्यान, कामरान अमीन खान झवेरी बाजार येथे तो सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत असून मांडवी येथे राहणारा आहे. तो अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे तपासात समोर आले आहे.


Protected Content

Play sound