“९ ऑगस्ट किसानमुक्ती दिन”; लोकसंघर्ष मोर्चाचे जळगावात आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । ९ ऑगस्ट दरवर्षी ऑगस्टक्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधत देशभरातील शेतकरी संघटनांनी किसान मुक्तीचा नारा घेवून आंदोलन केले . अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती ही राष्ट्रीय पातळीवर संघटीत झालेल्या शेतकरी संघटनांची समिती आहे ९ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांवर सातत्याने होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध व त्यांच्या मागण्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे त्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले देश भरात आज विविध संघटनांनी कोरोना संसर्ग लक्षात घेवून गावोगावी निदर्शने केली आणि पंतप्रधान यांना ९ मागण्यांचे पत्र पाठवले स्थानिक ठिकाणी तहसीदार यांना १० ऑगस्ट रोजी निवेदन दिले जाणार आहे . जळगावात शेतकऱ्यांच्या या आंदोलनासाठी लोकसंघर्ष मोर्चाने पुष्कर घेतला होता

जागतिकीकरणाचा स्वीकार केला तेव्हाच या सर्व धोरणात यादेशातील सामान्य जनता, शेतकरी जल, जंगल जमिनीवर अवलंबून असणारा आदिवासी, मजुरी करणारा कष्टकरी मजदूर नाडला जाणार , त्याचे शोषण केले जाणार हे जाहीर होते परंतु आता देशभरातील शेतकरी आदिवासी कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेने या विरुद्ध एल्गार पुकारला असून त्याचाच एक भाग म्हणजे ९ ऑगस्ट रोजी होणारे देशव्यापी किसान आंदोलन ठरले आहे ज्यात किसान मुक्तीचा नारा देऊन शेतकऱ्यांना त्वरित कर्जमुक्ती करा, शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या, शेतकरी व आदिवासींच्या विरोधातील काढलेले अध्यादेश तात्काळ मागे घ्या, शेतकऱ्याचे वीजबिल माफ करत वीज सुधारणा बिल २०२० मागे घ्या, या मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या .

डीझेलच्या किंमती कमी करा, कोरोना काळात शेतकरी व कष्टकरी वर्गाला पूर्णरेशन द्या, दुधाला हमीभाव वाढवून द्या, आदिवासींना त्यांनी दाखल केलेले दावे त्वरित निकाली काढून त्यांच्या शेतीचा अधिकार द्या, या मागण्यांसाठी गावोगावी कोरोनाची सुरक्षा पाळत शेतकऱ्यांनी विरोध व्यक्त केला उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी शेतकरीही यात उतरले होते जळगांव जिल्ह्यातील -यावल, रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, बोदवड, भुसावळ, चाळीसगाव व जळगाव तालुक्यातील शेकडो गावांमध्ये आणि नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा ,अक्कलकुवा व धडगाव तालुक्या मधील शेकडो गावांमध्ये लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने सहभाग घेतला . हे शेतकरी तालुकास्तरावर तहसीलदार यांना दि. १० ऑगस्ट रोजी निवेदन देतील

शासनाने आतातरी शेती कडे गांभीर्याने बघून शेतकऱ्याला त्याच्या समस्यांच्या गर्तेतून बाहेर काढावे देशाची अर्थव्यवस्था हि शेतीशिवाय अपूर्ण असून खऱ्या अर्थाने राष्ट म्हणून आर्थिक महासत्ता म्हणून प्रगती करायची असेल तर शेतकरी हा त्यातील एक महत्वाचा घटक आहे हे विसरू नये म्हणूनच ९ ऑगस्ट रोजी झालेल्या किसान मुक्ती आंदोलनाची दखल शासनाने घ्यावी अन्यथा हे शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र होईल हे विसरू नये, असा इशारा प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, अशोक पवार, भरत बारेला, केशव वाघ, चंद्रकांत चौधरी, धर्मा बारेला, ताराचंद बारेला, प्रकाश बारेला, भारती गाला, संदीप घोरपडे, पन्नालाल मावळे, अतुल गायकवाड, महेंद्र गायकवाड, सोमनाथ माळी, इरफान तडवी, अहमद तडवी आदींनी दिला आहे

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/716452139147271

Protected Content