रावेर शहरातील कृषी केंद्रांची झाडाझडती

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील कृषी केंद्र चालक हे खत देत नसल्याच्या तक्रारीवरून आज कृषी खात्याच्या पथकातर्फे दुकानांची झाडाझडती करण्यात आली असून याचा अहवाल जिल्हा स्तरावर पाठविण्यात आला आहे.

रावेर शहरातील कृषी दुकानदार शेतीसाठी रासायनिक खत असल्यावर देत नसल्याची तक्रार कर्जोत येथील शेतकर्‍याने केल्या नंतर आज कृषी अधिकार्‍यांनी दुकानांची झाडा-झडती घेत चौकशी करून अहवाल जिल्हास्तरावर पाठवला आहे

कर्जोत येथील निलेश साबळे यांनी याबाबतची तक्रार केली आहे. दुकानांमध्ये रासायनिक खत १०,२६,२६ असल्यावर देखील शहरातील कृषि दुकानदार देत नसल्याची तक्रार त्यांनी केली होती. या तक्राराची दखल घेऊन कृषी अधिकारी लक्ष्मण पाटील यांनी आज शहरातील दुकानांची झाडाझडती घेतली. त्यांनी या संदर्भातील अहवाल जिल्हा कृषी अधिकार्‍यांकडे पाठविला आहे. यामुळे शहरातील कृषी केंद्र चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Protected Content