यावल तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने स्वाक्षरी मोहिमेला सुरूवात

यावल प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधातील काळे कायद्याच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहीम कार्यक्रम आ.शिरीष चौधरी व माजी आ.रमेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व जि.प.गटनेते तथा तालुका अध्यक्ष यावल प्रभाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली किंनगाव येथे सकाळी ९ वाजता शेतकरी स्वाक्षरी मोहिम सुरू करण्यात आली.

प्रमुख उपस्थितात काँग्रेस गटनेता शेखर पाटील, बजार समिती माजी सभापती नितिन चौधरी, तालुका उपाध्यक्ष हाजी गफफार शाह, पंचायत समितीचे माजी उपसभापती उमाकांत आबा पाटील, सद्दाम शाह, उपसरपंच लतीफ तडवी, ग्राम.प. सदस्य किशोर पाटील, रफिक तडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळी १०:३० वाजता साकळी येथे जेष्ठ कार्यकर्ते सुभाष महाजन, माजी उपसरपंच किरण महाजन साकळी, माजी सरपंच समाधान सोनवणे(थोरगव्हण), कॉंग्रेसचे यावल शहराध्यक्ष कदीर खान, युनूस भाई (साकळी), संदिप सोनवणे, गोविंद पाटील(मनवेल) गोकूल तायडे, गंगाराम तायडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्वर भाई(साकळी), वसिम खान, ग्रा.पं.सदस्य जगदिश मराठे, सैय्यदअश्पाक सैय्यद शौकत, सचिन चौधरी यांच्यासह असंख्य पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी प्रमुख पदाधिकारी यांनी मनोगत शेतकऱ्यांच्या अनेक गंभीर प्रश्नावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. या कार्याक्रमादरम्यान तालुक्यातील अनेक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी, शेतमजूर यांनी निवेदनावर सहया केल्या. तर दुपारी १२ वाजता दहिगाव येथे माजी सरपंच दिलीप पाटील, सरपंच सत्तार तडवी, गौरव महाजन आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 

तसेच दुपारी १ वाजता कोरपावली येथील माजी सरपंच तथा ग्रामीण सेवा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल, ग्राप सदस्य राजेंद्र पाटील, पराग महाजन ,मुक्तार पटेल, तालेब पटेल, नारायण अडकमोल, रवींद्र तायडे, एकनाथ महाजन, डॉ, राजू पटेल, इस्माईल तडवी, हमीद पटेल, अशोक तायडे यांच्यासह आदी शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, 2 कोटी सह्यांचे निवेदन हे सोनिया गांधी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना पाठविले जाणार आहे.

 

Protected Content