Home Cities जळगाव ‘त्या’ जाहिरातीस स्थगिती द्या – जळगाव जिल्हा हॉकर्स संघर्ष समितीची मागणी (व्हिडिओ)

‘त्या’ जाहिरातीस स्थगिती द्या – जळगाव जिल्हा हॉकर्स संघर्ष समितीची मागणी (व्हिडिओ)

0
109

 

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव महापालिका यांनी शहर पथ विक्रेता समिती  गठित करण्याबाबत ८ जानेवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीस स्थगिती देण्यात यावी अशी मागणी जळगाव जिल्हा हॉकर्स संघर्ष समितीतर्फे महापौर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

शुक्रवार ८ जानेवारी रोजी जळगाव महापालिकेतर्फे शहर पथ विक्रेता समिती  गठीत करण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यातआली आहे. या जाहिराती बाबत योग्य तो खुलासा व्हावा, जाहिरातीस स्थगिति देवून, शुद्धिपत्रक काढून मुदत वाढवावी. या करिता स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील व महापौर सौ. भारती सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जळगाव जिल्हा हॉकर्स संघर्ष समितीचे पदाधिकारी सुनील सोनार, मोहन तिवारी, दिनेश हिंगने, सुरेश चौधरी, प्रभाकर तायडे, सुनील जाधव, रवि महाजन, किशोर नेवे, रवींद्र महाजन आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/508992935887325/videos/846521905909524

 


Protected Content

Play sound