Home Cities अमळनेर अमळनेर नगरपरिषदेतर्फे महामानवास अभिवादन

अमळनेर नगरपरिषदेतर्फे महामानवास अभिवादन

0
132


अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । अमळनेर नगरपरिषद कार्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार अनिल पाटील व अमळनेर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रशांत सरोदे मुख्याधिकारी, अमळनेर नगर परिषद माजी नगरसेवक नरेंद्र सदाशिव, माजी नगराध्यक्ष तथा खाशी संचालक विनोद पाटील, खासी संचालक अनिल शिंदे, उपमुख्य अधिकारी संदीप गायकवाड, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, अभियंता दिगंबर वाघ व इतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी कोविडमध्ये निधन झालेल्या अमळनेर नगर परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी रुपये पन्नास लाखचा धनादेश आमदार अनिल पाटील व माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता साहेबराव पाटील व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.


Protected Content

Play sound